NCP leader Sharad Pawar
NCP leader Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (दि ११)अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांचे पुरंदर तालुक्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

    बारामती : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी (दि ११)अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांचे पुरंदर तालुक्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

    शनिवारी शरद पवार बारामती येथील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत त्यांना त्रास जाणू लागला त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील तेथे उपस्थित होत्या. त्यांनी तात्काळ डॉक्टरांची एक टीम बोलावली आणि त्यांची तपासणी केली.सततच्या कार्यक्रमांमुळे व विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यामुळे डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या प्रकृतीची खबरदारी घेता शरद पवार यांचे पुरंदर तालुक्यातील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. दरम्यान दिवाळीनिमित्त सर्व पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र येत असतात. यावेळी देखील सर्व कुटुंबीय एकत्र आले आहेत.