अजित पवारांसह 40 आमदारांबाबत शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र; पत्रात काय म्हटलंय?

कारवाईवर हा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. अजित पवार यांनी कोणत्या अधिकारात बैठक बोलाविली, व ते कशाच्या आधारावर अध्यक्ष झाले असा आक्षेप व सवाल उपस्थित करत, अशा आशयाचे पत्र शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला दिले आहे.

  मुंबई : मागील वर्षी शिवसेनेच्या फूटीनंतर जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील मोठी फूट  पडली.  यानंतर अजितदादा गटाने सरकारमध्ये सहभागी होत, मंत्रीपदं देखील पटकावली. त्यामुळं शरद पवार गटाला गळती लागली आहे. यानंतर आपण कोर्टात जाणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसेच आपला प७ फुटला नसून, काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. असं शरद पवार म्हणाले होते. मात्र दोन्ही गट आता आमनेसामने आले आहेत. यानंतर शरद पवार गटाने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. (sharad pawar group letter to election commission regarding fourty mla including ajit pawar what does the letter)
  पक्षावर अजितदादा गटाचा दावा चुकीचा
  दरम्यान अजित पवार यांच्यासह ११ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनी केलेला दावा हा चुकीचा असल्याचं शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे म्हटलं आहे.
  पक्षातील बंडानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. या पत्राच्या आधारे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावत उत्तर देण्यास संगितले होते.
  पत्रात काय म्हटलंय…
  काही निवडक आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात फूट पडली असे होत नाही, असा दावा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली. बंडानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह १२ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार हे पक्षावर दावा करू शकत नाहीत. कारवाईवर हा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला आहे. अजित पवार यांनी कोणत्या अधिकारात बैठक बोलाविली, व ते कशाच्या आधारावर अध्यक्ष झाले असा आक्षेप व सवाल उपस्थित करत, अशा आशयाचे पत्र शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला दिले आहे.