Solapur Lok Sabha: Sharad Pawar's strong plot, cut the throat of Fadnavis' favorite leader in BJP

Solapur Lok Sabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा एक महत्त्वाचा नेता आणि फडणवीसांच्या मर्जीतील नेता शरद पवारांनी अखेर गळाला लावला आहे. संजय क्षीरसागर हे उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या तोंडाव हा भाजपसाठी धक्का मानला जातो.

  सोलापूर : लोकसभेचे (Lok Sabha 2024) बिगूल वाजले आणि प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. सोलापूर लोकसभेत (Solapur Lok Sabha 2024) भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यात थेट लढत आहे. ऐन लोकसभेच्या तोंडावर शरद पवारांनी सोलापुरातील भाजपचा महत्त्वाचा नेता आणि फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मर्जीतील माणूस फोडला आहे. भाजपचे संजय क्षीरसागर (Sanjay Khirsagar)उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
  गेल्या दहा वर्षांत कायम अपमानास्पद वागणूक
  सोलापुरातील भाजपचे नेते तथा फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे भाजप नेते  संजय क्षीरसागर  शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.
  संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: संजय क्षीरसागर यांनी दिली. संजय क्षीरसागर यांनी भाजपकडून मोहोळ विधानसभादेखील लढवली आहे. भाजपात गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.
  2006 सालपासून मला पक्षात अपमानास्पद वागणूक
  संजय क्षीरसागर म्हणाले,  गेली 25 वर्षे म्हणजे 1998-99 पासून भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. जिल्हापरिषद , विधानसभा, जिल्हा पंचायत अशा अनेक निवडणुका लढवल्या. सामान्य जनतेवर होणाऱ्या अन् अनेक मोर्चे काढले. कठीण काळात भाजपसोबत होतो. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ज्या तालुक्याकील लोकांनी माझी पाठराखण केली. त्यांना मी आजपर्यंत काही देऊ शकलो नाही.
  जनतेला न्याय देण्यासाठी भाजप सोडण्याचा निर्णय
  लोकसभेची चार वेळा उमेदवारी मागितली परंतु मला उमेदवारी दिली नाही याचे मला दु:ख नाही. पण 2006 सालपासून मला पक्षात अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. 2014 च्या पराभवानतर पक्षाची इच्छा असताना पक्षातील काही नेत्यांच्या दबावामुळे पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष केले. जनतेला न्याय देण्यासाठी भाजप सोडण्याचा निर्णय घेत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत मी प्रवेश करणार आहे. प्रणिती शिंदेंना पाठिंबा देणार आहे, असेही संजय क्षीरसागर म्हणाले.
  प्रणिती शिंदेंचा करणार प्रचार
  सोलापुरात आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना होत आहे. त्यामुळे, ही लढाई माजी मुख्यमंत्र्यांची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी असल्याचा प्रचार आमदार राम सातपुते यांनी केला होता.