बीडमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा; भूमिका स्पष्ट करणार, तर अजित पवार गटावर… 

शरद पवारही सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, आज शरद पवार हे बीडमध्ये सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जातंय.

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पवार गट व अजित पवार गट यांच्यात तुतु मैमै सुरु आहे. पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. असे असले तरी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात गुप्तभेटी होत आहेत. यामुळं शरद पवार यांच्या नेमकी भूमिका काय यावरुन शंका उपस्थित केली जात आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवारही सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, आज शरद पवार हे बीडमध्ये सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जातंय. (Sharad Pawar’s public meeting in Beed today; Will explain the role, while Ajit Pawar on the group)

    कोण कुणाला कोंडीत पकडणार

    दरम्यान, आज बीडमध्ये शरद पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांची ही सभा अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्यासाठी असू शकते, असंही बोललं जात आहे. या सभेवरुन मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाला कोंडीत पकडतंय, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून शुभेच्छा.” अशी प्रतिक्रिया बीडमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळं आजचा सामना हा मुंडे विरुद्ध पवार असा रंगणार असल्याचं बोललं जातंय.

    भूमिका स्पष्ट करतील…

    बीडमधील सभा खूप मोठी असेल. बीडनंतर पुण्यातही सभा होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगला संवाद आहे. पण काँग्रेसच्या मनात काही शंका असू शकते, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणालेत. तसेच बीड येथील सभेतून शरद पवार अधिक स्पष्टपणे आपली भूमिका मांडतील. असं देखील रोहित पवारांनी सांगितले आहे.