जवाहरला नेहरू ते नरेंद्र मोदी अशा पंतप्रधानांमुळे इस्त्रोला यश : शरद पवार

    कोल्हापूर : भारताचे चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचणे ही देशासाठी मोठी घटना आहे. या ऐतिहासिक घटनेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंपासून आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांचे योगदान होते. त्यामुळे इस्त्रोला हे यश मिळाले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे.

    इस्रोच्या यशात अनेक पंतप्रधानांची महत्त्वाची भूमिका

    पवार म्हणाले, या सभेनिमित्त मला एका गोष्टीचं आनंद झाला, संपूर्ण जग काल संध्याकाळी चांद्रयान ३ चंद्रावर उतरणार होतं, म्हणून तिकडं डोळे लावून बसले होते. ते उतरलं, एक ऐतिहासिक काम या देशातील वैज्ञानिकांनी करुन दाखवलं. या कामात महत्वाची भूमिका इस्त्रोनं केली. या इस्त्रोच्या स्थापनेची भूमिका जवाहरलाल नेहरुंची होती. त्यानंतर याच इस्त्रोसाठी इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अब्दुल कलाम यांच्यासह आजचे पंतप्रधान मोदी यांचंही योगदान महत्वाचं होतं.