रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली खुली ऑफर; ‘आता देशहितासाठी…’

नागालँडमध्ये (Nagaland BJP) भाजपप्रणित मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याची गरज नसताना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्याबद्दल शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार. आता महाराष्ट्रात सुद्धा शरद पवार यांनी पाठिंबा द्यावा.

धाराशिव : नागालँडमध्ये (Nagaland BJP) भाजपप्रणित मुख्यमंत्र्यांना पाठिंब्याची गरज नसताना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. त्याबद्दल शरद पवार (Sharad Pawar) यांचे आभार. आता महाराष्ट्रात सुद्धा शरद पवार यांनी पाठिंबा द्यावा. राहुल गांधी काँग्रससोबत राहून उपयोग नाही. मला इकडे सोडून तिकडे राहू नये. पवारांनी सोबत यावे, अशी खुली ऑफरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी त्यांना दिली.

धाराशिव येथील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘काही मुद्यावर मतभेद आहेत. आम्हाला आकड्यांची आवश्यकता नाही. पण पवारांनी सोबत यावे. संविधान बदलतील ही अफवा आहे. पवार यांनी मोदींसोबत येऊन काम करावे. भाजपने संविधान बदलले ही अफवा आहे. त्यावर विश्वास ठेवू नये मी आहे तिथे. नागालँडमध्ये आदिवासी समाज जास्त आहे. माझ्या पक्षाला यश आले 2 आमदार झाले. तिथे शरद पवार यांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल स्वागत’.

धाराशिव नाव झाल्याबद्दल आभार

धाराशिव नाव झाल्याबद्दल आभार. नामकरणाला आमचा पाठिंबा आहे. मागासलेल्या भागात सिंचन, उद्योग, रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विकसाच्या दिशेने वाटचाल आहे, सर्व प्रश्न सोडविले असे नाही. मात्र, पंतप्रधान मोदी प्रयत्न करीत आहेत. 2024 ला आम्ही सत्तेवर येऊ.

…म्हणून उद्धव ठाकरेंनी धोका दिला

मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी मोदी व भाजप यांना धोका दिला. ही ठाकरे यांची मोठी चूक आहे. शिंदे सरकार पडेल असे नाही. शिवसेना नाव त्यांना मिळाले आहे, निवडणूक आयोगाने योग्य निर्णय दिला. नामांतरण मान्य आहे. विरोध करुन काय करणार, सरकारने निर्णय घेतला आहे. आम्ही सोबत आहोत, असे त्यांनी सांगितले.

फडणवीसांनी पुढाकार घ्यावा

एनडीएमध्ये उद्धव ठाकरे परत येतील असे वाटत नाही. सामंजस्याने येत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. ठिकठिकाणी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये आरपीआयला संधी मिळावी अशी अपेक्षा आहे.