पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना जाहीरसभेतच दिली ‘ही’ खुली ऑफर; म्हणाले…

सध्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. आत्तापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. अजूनही काही टप्पे बाकी आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

    नंदुरबार : सध्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. आत्तापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. अजूनही काही टप्पे बाकी आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नंदुरबार येथील जाहीरसभेत शरद पवारांना (Sharad Pawar) खुली ऑफरच दिली.

    नंदुरबार येथील जाहीरसभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना ऑफर दिली आहे. त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांनी पक्ष विलीनीकरण करण्यापेक्षा अजित पवार यांच्यासोबत यावे तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, असे ते म्हणाले. यापूर्वी शरद पवार यांनी काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे म्हटले होते. त्यांच्या याच विधानावरून पंतप्रधान मोदींनी हे मोठं विधान केले आहे.

    दरम्यान, तीन टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ झाले आहेत. मोदींमुळे लोकशाही संकटात आली आहे. मोदींनी केजरीवाल आणि सोरेन यांना तुरुंगात टाकलं, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच मोदींच्या ऑफरवर पवार म्हणाले, ‘लोकशाहीवर विश्वास नसलेल्यांसोबत मी जाणार नाही’, असे म्हणत त्यांनी नकार दिला.