sharad pawar

उध्दव ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आजकाल शिवसेनेतून बाहेर पडलेले चाळीस आमदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ठाकरे आगपाखड करीत आहेत ते ज्या भाषेत टिका करीत आहेत ती मात्र भाषा योग्य नाही.

  सांगली : सध्या मुख्यमंत्री होण्यापूर्वीच काहींचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागले आहेत. हे अतिशय हास्यास्पद आहे. शिंदे – फडणवीस यांचे सरकार मजबूत असल्याने अजितदादांसह इतरांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल असे वाटत नाही. तसं पाहिलं तर मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतयं परंतु एकतर आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या कमी असल्याने ती शक्यता नाही आणि दुसरे म्हणजे मला दिल्लीतून महाराष्ट्रात येण्याची आजघडीला इच्छा नाही, अशी गुगली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी टाकली. शरद पवारांना (Sharad Pawar) भाकरी फिरवायची असेल तर त्यांनी जरुर फिरवावी म्हणजे त्यांनी एनडीएत यावे. मी आलोय मग त्यांना काय अडचण आहे ? असा प्रश्नही यावेळी मंत्री आठवले यांनी उपस्थित केला.

  मंत्री आठवले म्हणाले, सांगली जिल्ह्यात नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना महापूराच्या कालावधीत आपले घर सोडावे लागते. यापार्श्वभूमीवर येथील जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे कायमस्वरुपी स्थलांतर करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा. यासंदर्भातील निर्देश नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बैठकीत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या गावी गेले आहेत. मात्र, शिंदे हे कायमचे सुट्टीवर जावेत, अशी काहींची इच्छा आहे. राज्य सरकारकडे असलेले संख्याबळ पाहता सरकार मजबुत आहे. भविष्यात शिंदेंना सुट्टीवर जायची गरज भासणार नाही. न्यायालयाचा निकाल देखील सरकारच्या बाजूनेच येईल, असा विश्वास आहे.

  उध्दव ठाकरे माझे मित्र 

  उध्दव ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. आजकाल शिवसेनेतून बाहेर पडलेले चाळीस आमदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ठाकरे आगपाखड करीत आहेत ते ज्या भाषेत टिका करीत आहेत ती मात्र भाषा योग्य नाही.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकास यानुसार वाटचाल करीत आहेत. संविधानाला मजबूत करण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याने आम्ही त्यांच्यासमवेत आहोत. खा. शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी भाकरी फिरवावी म्हणजे एनडीएत यावे. पवारांसारखा अनुभवी नेता मोदींच्या साथीला हवा असल्याचे मतही मंत्री आठवले यांनी व्यक्त केले.

  आरपीआयवरील दलितांचा शिक्का पुसणार

  मंत्री आठवले म्हणाले, रिपब्लिकन इंडिया ऑफ इंडिया या पक्षाकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टीकोन हा दलितांचा पक्ष असा आहे. 28 मे रोजी शिर्डी येथे पक्षाचे अधिवेशन आहे. त्यामध्ये हा लोकांच्या मनात असलेला हा शिक्का पुसण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येतील. आगामी निवडणूकीत केवळ दलितांनाच तिकीट न देता विविध जाती धर्मातील इच्छुकांना तिकीट वाटप करण्यात येईल.