मी पुन्हा येईन! या घोषणेवरून, पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घ्यावे : शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

    बीड : आज राष्ट्रवादीच्या स्वाभिमान यात्रेतून शरद पवार यांनी बीडमधील सभेत नागरिकांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शरसंधाण केले. शरद पवार यांनी मोदींना खोचक टोला लगावत, 15 अॉगस्टच्या पंतप्रधानांच्या भाषणाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या लालकिल्ल्याच्या भाषणाचा आशय घेत, पंतप्रधानांनी घोषणा केली, मी पुन्हा येईन! यावरच शरद पवार यांनी खोचक टोला लगावत मोलाचा सल्ला दिला आहे.

    राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कौतुक 

    बीडमधील शरद पवार यांच्या स्वाभिमान यात्रेमध्ये शरद पवार यांनी आयोजक संदीप क्षीरसागर यांचे कौतुक करताना, एवढे नियोजन केल्याबद्दल त्यांना शाबासकी दिली. त्याचबरोब त्यांच्या आजी केशरकाकू यांची आठवण काढत त्यांनी ज्याप्रमाणे मागच्या काळात निष्ठेसोबत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली, त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी त्यांनी दाखवली. आणि त्यांना त्यामध्ये यशसुद्धा मिळाले. तोच कित्ता आज त्यांच्या नातूने गिरवत निष्ठेने आमच्यासोबत उभा राहिला यामुळे ते कौतुकास पात्र आहेत, असा उल्लेखसुद्धा त्यांनी केला.

    मणिपूर हिंसाचारावरून टीका

    मणिपूर हा भारताच्या उत्तरेचा भाग, अरुणाचल प्रदेश, नॉर्थ इंड़ियाबाबत सांगायचे सोडून, मणिपूरच्या सीमा सर्व आजूबाजूच्या देशांना लागली. दोन समाजात तेढ, हिंसाचार होत असताना, भाजपचे सरकार यावर काही भूमिका घेत नाही. जात, धर्म आणि भाषा यातून तेढ कशी निर्माण होईल याची खबरदारी आताचे सत्ताधारी घेत असल्याचे पाहायला मिळाले.

    पंतप्रधान संसदेत फक्त 3 मिनिटे बोलले

    समाजाला शांत करण्याची गरज होती, पंतप्रधान फक्त 3 मिनिटे बोलले. अशी स्थिती अनेक राज्यात असताना, त्याच्यावर काम करायचे सोडून
    कर्ऩाटकला सरकार पाडले, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले, महाराष्ट्रात पाडले, तुम्ही स्थिर सरकार देण्याची भूमिका बोलता आणि राज्यातील सरकारे पाडता.

    15 अॉगस्टच्या भाषणात पंतप्रधान मोदी केवळ मी सत्तेत कसा येईल याची चिंता दिसल्याची खोचक टीका त्यांनी केली. मी पुन्हा येईन! या त्यांच्या घोषणेवर शरद पवारांनी त्यांना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. कारण महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री यांनी अशीच घोषणा दिली परंतु, ते सत्तेवर आले पण त्यापदावर नाही आले, दुसऱ्याच पदावर आले.