शरद पवार आज दिल्लीला जाणार; विरोधी पक्षाशी करणार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या २७ जून रोजी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे (President) उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) उमेदवारी दाखल करणार आहेत.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज मुंबईहून दिल्लीला रवाना होणार आहेत. उद्या २७ जून रोजी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे (President) उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) उमेदवारी दाखल करणार आहेत. यासाठी पवार दिल्लीला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

    शरद पवार यांचा दिल्ली दौरा राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे असे सांगण्यात येत आहे. मात्र, या दौऱ्यात ते काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करतील. तसेच, इतर विरोधी पक्षांसोबत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.