आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर शरद पवार भेट घेणार, जयंत पाटील यांची माहिती

सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही, सरकार अजूनही अस्तित्वात आहे, तसेच कामकाज सुरू असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे, तसेच आज संध्याकाळी मातोश्री (Matoshree) बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली.

    मुंबई : शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 48 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची एक बैठक पार पडली. (MVA Meeting Sharad pawar, dilip walse patil, anil desai, sanjay raut) त्याआधी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जिल्हासंपर्कप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर आता विरोधक सुद्धा आक्रमक झाले असून, विरोधकांनी सुद्धा रणनिती आखयला सुरुवात केली आहे.

    दरम्यान, सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही, सरकार अजूनही अस्तित्वात आहे, तसेच कामकाज सुरू असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे, तसेच आज संध्याकाळी मातोश्री (Matoshree) बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली.

    गुहावटीत (Guhavati) एकनाथ शिंदेंकडी 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा त्यांनी दावा केली आहे, यावर पाटील यांना विचारता अडीच वर्ष एकत्र राहिल्यावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू असताना अशाप्रकारची कारणं देणं चुकीचं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जे आमदार गुवाहटीला गेले आहेत त्यापेक्षा वेगळं काही महत्व यामध्ये नाही असे सांगत जयंत पाटील यांनी शिवसेना आमदारांच्या बंडाची हवाच काढून टाकली.