जळगावात शरद पवार यांचं आगमन, युवक कॉंग्रेसनं चार क्विंटल फुलांचा हार घालून केलं स्वागत

एका कार्यक्रमानिमित्त जळगावात आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयाजवळ जल्लोषात व जंगी स्वागत करण्यात आले

    जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच आज जळगावात आगमन झालं. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाजवळ शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी युवक कॉंग्रेसच्या वतीने चार क्विंटल फुलांचा हार घालून त्यांच स्वागत करण्यात आलं.

    एका कार्यक्रमानिमित्त जळगावात आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयाजवळ जल्लोषात व जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजर, गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी युवक कॉंग्रेसच्या वतीने चार क्विंटल फुलांचा हार घालून त्यांच स्वागत करण्यात आलं.