अजित पवारांनी निवडणुकीचा फॉर्म भरतानाच आपली भूमिका ठरवायला पाहिजे होती; केवल लोकांपासून बचाव करण्याकरिता आमच्यावर टीका : शरद पवारांचा पलटवार

  पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पुणे येथे पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार गटाची भूमिका ही बदलेली आहे, निवडणूक लढवताना त्यांचे नेतृत्व काय होते, आता नेतृत्व काय आहे यातून पळवाट म्हणू आमच्यावर टीका होत असल्याचा टोला शरद पवारांनी लावला. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवरील त्यांची भूमिकादेखील स्पष्ट केली.
  अजित पवार घेतलेला निर्णय पक्षाशी सुसंगत नव्हता
  ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करीत होते, तो आम्हाला मान्य नव्हते. तसेच, आमच्या धोरणाशी ते सुसंगत नव्हते. लोकांना आम्ही जी मते मागितली ती भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. त्यांची भूमिका आमच्या विचारांशी सुसंगत नव्हती, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही. शेवटी लोकांसमोर जायचे असते, त्यांच्यासमोर भूमिका मांडायची असते, त्यामुळे ती योग्य असावी, याकरिता योग्य विचार घेऊन लोकांसमोर जायचे असते. अजित पवारांनी निवडणुकीचा फॉर्म भरतानाच आपली भूमिका ठरवायला पाहिजे होती, आता त्यांनी आपला निर्णय बदलला तर लोकं स्वीकारणार नाहीत. तेव्हा ज्यांचे नेतृत्व स्वीकारले आता लगेच बदलले तर हे लोकांना मान्य होणार नाही.
  माझा निर्णय मी घेण्याची क्षमता माझ्यात
  कुणाचेही सांगून मी राजिनामा देतो अशी स्थिती नव्हती. त्याचबरोबर परांजपे आणि आव्हाड यांचे ऐकून मी राजिनामा द्यावा, एवढा मी लहान नाहीये. माझ्यात अजूनही माझा निर्णय घेण्याची क्षमता आहे.
  मी सर्वसामान्य जनतेबरोबर 60 वर्षे आहे. लोकं अशी टीका-टीप्पणी गांभीर्याने घेत नाहीत, ते विचार करून आपला निर्णय घेऊन नेतृत्व स्वीकारतात.
  बारामतीचा उमेदवार जयंत पाटील ठरवतील
  लोकं त्यांना विचारतील, तुम्ही निवडणूक लढवताना तुमचा नेता कोण होता, आता तुम्ही कोणासोबत आहात, तुम्ही कोणत्या चिन्हावर लढला आता कोणत्या चिन्हाकडे तुमची वाटचाल आहे. हे सर्व जाणकार मतदार त्यांना विचारणार यापासून दूर पळण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू आहे.