अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचे टीकास्त्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अजित पवारांबद्दल मोठं विधान करत टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं वक्तव्य पवार यांनी अकोल्याच्या दौऱ्यावर असताना केला. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

    अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अजित पवारांबद्दल मोठं विधान करत टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं वक्तव्य पवार यांनी अकोल्याच्या दौऱ्यावर असताना केला. यावेळी त्यांनी सहकार मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

    जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले, “हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही”

    शरद पवार काय काय म्हणाले?
    जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल. सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. मी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घटनाला गेलो. सार्वजनिक कार्यक्रमात जावं लागतं. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाहीय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे,आमची नव्हे.भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.