“मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका”, आत्मचरित्राचा दाखला देत  भाजपाचा आरोप

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारवर टीका केली होती.

    मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान याप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर भाजपाने आता प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी शरद पवार मराठा आरक्षण प्रश्नी दुटप्पी भूमिका घेत असल्याचंही भाजपाने म्हटलं आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा दाखला देत सांगितले कि मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची दुटप्पी भूमिका आहे.

    काय म्हणाले केशव उपाध्ये?

    “मराठा आरक्षणप्रकरणी शरद पवार यांची भूमिका दुटप्पी होती हे कळून घ्यायचं असेल तर त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. या आत्मचरित्रात मराठा समाजाचा विकास का होत नाही हे त्यांनी लिहिलं आहे. मराठा समाजामध्ये ३०-४० वर्षांपासून असंतोष वाढतोय, असं त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं. मग या ३०-४० वर्षांत त्यांनी काहीच का केलं नाही, मराठा आरक्षण मिळण्यास थेट अडचणी होत्या. थेट अडचणी असतील तर मार्ग का काढले नाहीत”

    “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सारथी सुरू करून मराठा समाजाला संधी उपलब्ध करून दिली. देवेंद्र फडणीसांना आरक्षण मिळवलं आणि टिकवलं. पण अडीच वर्षांच्या कार्यकाळात पवार साहेबांनी सुप्रिम कोर्टात चांगले वकील का नाही केले? याचा खुलासा केला पाहिजे”

    “आरक्षण देणे हे वादग्रस्त आहे, अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याच पुस्तकात आहे. जो समाज गरजू आहे, ज्या समाजाला आवश्यकता आहे त्यांना आरक्षण देणे गरेजं आहे. त्यात वादग्रस्त काय असू शकतं? याचाच अर्थ मराठाला समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका शरद पवारांनी वेळोवेळी मांडली होती. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका आहे हे त्यांच्याच आत्मचरित्रातून स्पष्ट होत आहे”, असंही केशव उपाध्ये म्हणाले.