
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा जातीचा खोटा दाखला नागपूर सेंटरमधून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी विकास पासलकर यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा जातीचा खोटा दाखला नागपूर सेंटरमधून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी विकास पासलकर यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
शरद पवार यांचा जातीचा दाखला सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या जातीच्या दाखल्यावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू असून हा दाखला खरा की खोटा ? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर शरद पवार यांचे समर्थक विकास पासलकर यांनी राजकीय आरोप केला आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा विषयांमध्ये खोलात जावं लागतं. एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी व्हिटामिन कुठून पुरवलं जातंय, हे शोधणं गरजेचं आहे, असे पालकर म्हणाले.
बदनाम करण्यासाठी षडयंत्र
माध्यमांशी बोलताना पासलकर म्हणाले, शरद पवार यांचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा जातीचा दाखला हा खोटा असून शरद पवार यांनी ओबीसी सर्टिफिकेट कधीच घेतले नाही. आज राजकीय वर्तुळातील मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. हे षडयंत्र चुकीचे असून, अशी षडयंत्र रचणारी लोक कोण आहेत ते सर्वांना आहे. नागपूर सेंटरकडून हे घडत असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.