केतकी चितळेला अटक करताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. आता यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    नांदेड : अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली.

    कळवा इथे पहिला गुन्हा केतकी चितळेवरती दाखल झाला त्यांनतर पुण्यात गुन्हा दाखल झाला. आता केतकीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या संपुर्ण प्रकरणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    पवार म्हणाले ”मला त्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. मला व्यक्तीही माहित नाही आणि तुम्ही काय सांगताय हे देखील माहित नाही. नक्की काय बोलल्या आहेत हे माहिती झाल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही.”