अजित पवारांच्या भेटीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. पक्ष फूटीनंतर दोन्ही गटाचे नेते सातत्याने आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पक्षाबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला आहे. अशातच आता राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शरद पवार यांची भेट घेतली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. पक्ष फूटीनंतर दोन्ही गटाचे नेते सातत्याने आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पक्षाबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सध्या दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला आहे. अशातच आता राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवारांचे बंधू आणि उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीबाबत शारदा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    काय म्हणाले शरद पवार?
    या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले. राज्यातील जनतेला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखाची, आनंदाची जावो असे शरद पवार म्हणाले. प्रसारमाध्यमांनी अजित पावर आणि प्रतिभाताई पवार यांच्या तब्बेतीबद्दल विचारले. यावेळी शरद पवार म्हणाले की, सगळ्यांची तब्बेत चांगली असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, आज शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात भेट झाल्यानंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहे. दिल्लीत अजित पवार हे अमित शाह यांची भेट घेण्याची माहिती मिळत आहे.