पवारांच्या प्याद्याचं काम संपलं; संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

शिवसेना फुटल्यामुळे आता संजय राऊत यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार साधी प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत असा आरोपही शिरसाट यांनी केला. शिरसाट पुढे म्हणाले की, संजय राऊतांना आता त्यांची लायकी कळेल, ज्यांच्यासाठी त्यांनी शिवसेना संपवली, शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्यांना कर्माची फळे आता राऊतांना भोगावी लागत आहेत.

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी एक प्यादा (Pawn) होते. या प्यादाचे काम आता संपले आहे. ही गोष्टी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानेही ओळखली आहे, त्यामुळे आता ते प्रतिक्रिया देणार नाहीत, अशा शब्दात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी हल्लाबोल केला आहे.

    शिवसेना (Shivsena) फुटल्यामुळे आता संजय राऊत यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवार साधी प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत असा आरोपही शिरसाट यांनी केला. शिरसाट पुढे म्हणाले की, संजय राऊतांना आता त्यांची लायकी कळेल, ज्यांच्यासाठी त्यांनी शिवसेना संपवली, शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्यांना कर्माची फळे आता राऊतांना भोगावी लागत आहेत. शरद पवारांच्या स्वत:च्या पक्षातील दोन नेते तुरुंगात आहेत. त्यांच्यावर शरद पवार काही बोलले नाहीत, तर मग संजय राऊतांवर बोलयला राऊत कोण लागून गेले, असा सवालही शिरसाट यांनी उपस्थित केला.