शरद पवारांचे मोदींना सडेतोड प्रत्त्युत्तर, कृषिमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचा वाचून दाखवला पाढा…. 

    Sharad Pawar : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनग शिर्डी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना घेतल्या निर्णयांचा पाढा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.

    प्रधानमंत्री हे पद संविधानिक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन केल्यानंतर माझ्या कृषी खात्यातील सहभागावर काही मुद्दे मांडले. मला एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे. प्रधानमंत्री हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहीजे. त्यांनी दिलेली माहिती वास्तवापासून दूर आहे, असे शरद पवार म्हणाले.

    देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे

    २००४ ते २०१४ या काळा देशाच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर मी कटू निर्णय घेतला तो म्हणजे अमेरीकेतीला गव्हाचा आयात करणे. कारण देशात पुरवठा नव्हता. मी दोन ते तीन दिवस फाईलवर सही केली नाही. कारण भारत कृषीप्रधान देश असताना बाहेर देशातून धान्य आणावे हे मला मान्य नव्हते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

    देशात धान्यपुरवठा करता येणार नाही

    दोन दिवसांनी मला विचारण्यात आला देशातील साठ्याची माहिती तुम्हाला आहे का? ते म्हणाले फाईलवर सही केली नाही तर आपल्याला देशात धान्यपुरवठा करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे धान्य आयात केले, याचा फायदा देशाला झाला, असे शरद पवार म्हणाले.

    कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा यामुळे बदलला

    शरद पवार म्हणाले, २००४ मध्ये तांदूळ, गहू, कापूस, ऊस, सोयाबीन ह्या सगळ्या पिकाच्या हमीभावात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केली. महत्वपूर्ण निर्णयामुळे देशाचा कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा यामुळे बदलला गेला. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना घेतलेले निर्णय वाचून दाखवले.

    पीककर्जाचा दर ११ टक्के

    २००४ ते २०१४ मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम घेतले. २००५ ला नँशनल हॉर्टिकल्चर मिशन हाती घेतलं. गहू आणि भाताच्या उत्पन्नात‌ माझ्या काळात‌ मोठी वाढ झाली. पीककर्जाचा दर ११ टक्के होता तो ४ टक्क्यांवर आणला.  काही बँका ३ लाखांपर्यंत ० टक्क्यांनं कर्ज देत होत्या, असे शरद पवार यांनी सांगितले.

    तांदळाचं विक्रमी उत्पादन

    २०१५ मध्ये नरेंद्र मोदी यांनी माझ्या कामाचे कौतुक केले होते. तसेच २०१२ मध्ये जागतिक अन्नसंघटनेनं मान्य केलं की तांदळाचं विक्रमी उत्पादन झाले. पंतप्रधान हे संविधानिक पद आहे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र त्यांचे वक्तव्य वास्तवावर आधारित नव्हते. त्यांना वास्तवाचं भान दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.