कुणी गेले म्हणून चिंता करण्याची गरज नाही, संघटना स्वच्छ झाली, आता नवीन नेतृत्वाला संधी मिळेल : शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल

  पुणे : Sharad Pawars Strong Attack : आज शरद पवार गटाची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधन केले. ते म्हणाले की, जे पक्ष सोडून गेलेत, त्यांच्याकडून आज आपल्यावर टीका-टीपण्णी सुरू आहे. आता त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्याचे कारण असे आहे की, ज्यावेळी ते लोकांमध्ये जातील, तेव्हा लोकं त्यांना प्रश्न विचारतील तुम्ही कोणाचे नेतृत्व स्वीकारले होते, आणि आता कोणाकडे आहात. त्यामुळे त्यांना हा प्रश्न पडलेला असल्याने ते आता हे सर्व झाकण्यासाठी आपल्यावर टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. या उलट आता नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे.
  टीका करणाऱ्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही
  ज्यांना पक्ष सोडला, ज्यांनी पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर फारशी काळजी करण्याची गरज नाही. या राज्याचा जागृत मतदार आता त्यांना अनेक प्रश्न विचारेल, तुमची खूण काय होती, तुमचा कार्यक्रम काय होता, आणि आज तुम्ही कुठे गेला आहात. हे सर्व प्रश्न जागृत सामान्य माणूस त्यांना विचारणार या सर्वांपासून पळवाटा शोधण्याकरिता त्यांनी आपल्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे. त्यामुळे या टीकेला भीक न घालता, जागृत सामान्या माणसाला आवश्यक असलेल्या परिवर्तनाची तयारी आपल्याकडून झाली पाहिजे. हेच ठरण्याकरिता आपण सर्व एकत्रित आलो आहे.
  सत्ता येते-जाते, आता सत्ता गेल्यानंतर पुन्हा ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. नवीन ऊर्जा, नवीन उपक्रम घेऊन आपण परिवर्तन करण्याकरिता तयार राहिले पाहिजे, असे आवाहनसुद्धा शरद पवारांनी आज केले.

  शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार

  राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मोठी बातमी दिली आहे. शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार आहे. यात अमरावती, भंडारा, बारामती, सातारा, शिरूर, रायगड, रावेर, दिंडोरी या मतदारसंघाचा समावेश आहे. काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार आहोत. मार्च, एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आमची तयारी झाली आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

  राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं सांगितलं होतं. या मतदारसंघात जीवाचं रान करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी शरद पवार गट जे मतदारसंघ लढणार असल्याचं सांगितलं त्यात बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचाही समावेश आहे. म्हणजे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजितदादा गट उमेदवार देणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

  लढवणार की लढल्याचं दाखवणार?
  अजितदादा यांनी त्यांच्या गटाच्या जागा जाहीर केल्या आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांचा पक्ष वेगळा झालेला आहे, त्यांना काही जागा लढवाव्य लागतील. काही मतदारसंघात लढवतील ते. पण ते खरंच लढवणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचय, असा टोला त्यांनी लगावला.

  Sharad Pawars Strong Attack on Ajit Pawar Group They Said There is No Need to Worry Because Someone has Left Organization has been Cleaned Now New Leadership will Get a Chance nryb