You don't miss an opportunity to taunt your younger brother, Sharmila Thackeray's taunt to Uddhav Thackeray
You don't miss an opportunity to taunt your younger brother, Sharmila Thackeray's taunt to Uddhav Thackeray

    Sharmila Thackeray : आदित्य ठाकरेंच्या दिशा सालियान प्रकरणात अडचणी वाढतच चालल्या आहेत. विरोधी पक्षाने राज्यात सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आणले आहे. या प्रकरणाचा SIT मार्फत तपास केला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. या सर्व घडामोडी सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांच्या मागे शर्मिला ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आदित्य असं काही करणार नाही असं म्हणत त्यांनी आपणही अशा चौकश्यांतून गेलो असल्याचं म्हणत आदित्यची पाठराखण केली. यावर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत.

    शर्मिला ठाकरेंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

    उध्दव ठाकरे यांनी आभार मानल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी उध्दव ठाकरेंवर पलटवार केला आहे. ‘या विषयी मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला मात्र, तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का?’ असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी कधीच दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत, असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.