पैसे देऊन सून आणली आणि पाचच महिन्यात पळून गेली…

  नाशिकच्या (nashik) पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयाबाहेर तीन माणसं थांबलीयेत. कडक उन्हात दूरवरून तिथे आलीयेत. तिघांची एकच तक्रार आहे. हे तिघं माणसं केबिनमध्ये गेल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी मलाही बोलावलं. त्या लोकांच्या ज्या कैफियती होत्या, ते ऐकून घेणं माझं काम होतं.

  नवरीला मांडवात ताटकळत ठेवून नाचत होता नवरदेव, मुलीने घातली दुसऱ्याच्याच गळ्यात माळ “आम्हाला फसवलं त्या माणसाने,” त्या दांपत्यातली महिला म्हणते. त्यांचा आवाज भरून आलेला असतो. कडक उन्हात हे दोघं सिन्नर तालुक्यातून दुचाकीवर नाशिक शहरात आलेत.

  “त्या पोरीने पैसे घेतले, दागिने घेतले आणि पळून गेली, ती परत आलीच नाही. आता मुलगा माझा वेड्यासारखा करतो. त्याला किती धक्का बसला असेल. चिडतो, रागवतो, मारायला अंगावर धावतो,” त्या आजी पुढे म्हणतात. याच सुमारास एक व्हीडिओही माझ्या पहाण्यात आला होता, ज्यात लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर लग्न लागताना दिसत होतं. अक्षरशः दहा-बारा माणसं रस्त्यावर उभी आहेत, मोबाईलवर मंगलाष्टकं सुरू आहेत आणि घाईघाईत लग्न लागतंय. नाटकातलं खोटं खोटं लग्नपण यापुढे ऑथेंटिक वाटावं.

  मी कशाबद्दल बोलतेय. दोन दिवसात मुलगी पाहून घाईने केलेलं लग्न, मुलाकडच्या लोकांवर पैसै देण्याचा दबाव, अनेकदा मुलीच्या नातेवाईकांचाही पत्ता नाही आणि लग्नानंतर काही महिन्यातच मुलगी गायब. महाराष्ट्रातली अनेक मुलं आणि त्याचे आईवडील लग्नाच्या नावाखाली फसवणूक होण्याच्या रॅकेटला बळी पडत आहेत.

  “हे एजंट असे कुटुंब हेरतात ज्यांच्या मुलांचं लग्न जमत नाहीये. मुलांचं लग्न न ठरण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. मुलांचं वय कधी कधी जास्त असतं. दुसरी गोष्ट आपल्या समाजात मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे, त्यामुळे मुलांचं लग्न ठरताना उशीर होतो. अशा वेळेला आई वडिलांची चिंता वाढून जाते मग कोणी एजंट आला आणि म्हणाला की मी लग्न ठरवून देतो तर अशा वेळेला तर एजंटवर पटकन विश्वास ठेवतात.”

  दुसरीकडून हे एजंट अशा घरातल्या मुली आणतात ज्यांच्या घरचे गुन्हा करायला तयार असतात. आपण मुलीच्या आईला (mother), आरोपीला आपण अटक केली तेव्हा तिने सांगितलं की परिस्थितीमुळे ते या गुन्ह्यात सहभागी झाले. मुलीचं वय १८ वर्षांपेक्षा कमी होतं ही देखील पोलीसांच्या (Police) दृष्टीकोनात गंभीर बाब होती.

  पण लोकलज्जेस्तव गुन्हे दाखल होत नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आणि फसवणूक झाली तर लगेच पोलिसात तक्रार करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.अनेक प्रकरणातल्या मुली मराठवाड्यातून (marathawada) आल्या आहेत अशी माहिती आम्हाला पोलिसांनी दिली.

  या प्रकरणी आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. मराठवाड्यात ऊसतोड (suger ken) कामगार महिलांबरोबर काम करणाऱ्या मकाम या संस्थेच्या सीमा कुलकर्णी म्हणाल्या की, “अशी प्रकरण आमच्यासमोर तर आली नाहीयेत. पण यात मुलींचं शोषण होतं असल्याचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. कोव्हीडच्या काळातही आर्थिक चणचणीमुळे मराठवाड्यात अनेक बालविवाह झाले. हा ट्रॅफिकिंगच्या (triffic) मोठ्या रॅकेटचाही (raket) भाग असू शकतो.”