शीतल म्हात्रे- प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडिओ व्हायरल, तर ठाकरे गटावर…; शितल म्हात्रे म्हणाल्या…

दहिसरमध्ये शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, या व्हायरल व्हिडिओवर अश्लिल मजकूर टाकण्यात आला आहे. याप्रकरणी दहीसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई– राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट (Shinde group) व ठाकरे गट (Thackeray group) ऐकमेकांसमोर येताना दिसत आहेत, आरोप प्रत्यारोप तसेच टिका टिपण्णीचे राजकारण होत आहे. पण आता राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे दहिसरमध्ये शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, या व्हायरल व्हिडिओवर अश्लिल मजकूर टाकण्यात आला आहे. याप्रकरणी दहीसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडे अंगुलीनिर्देश…

हा प्रकार ठाकरे गटाकडून झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. तसेच या प्रकाराबद्दल विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जातील, असे वाटले नव्हते. सोशल मीडियावरील मातोश्री नावाच्या अकांऊटमधून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. मातोश्री नावाच्या पेजवरुन महिलेची अशी बदनामी करणे, विरोधकांना शोभते का?, असा सवाल करत शीतल म्हात्रेंनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला टोला लगावला. तसेच शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून, संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

गुन्हा दाखल तर दोघांना अटक

या व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहिसरमधील रॅलीत सामील झाले होते. या रॅलीमधीलच शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर टाकून व्हायरल करण्यात आला आहे.