बांबवडेच्या मैदानात शेख ठरला ‘सिंकदर’, दोन्ही कुस्ती मैदानात मारली बाजी; माऊली कोकाटे, महेंद्र गायकवाडने गाजवला आखाडा

बांबवडे (ता. ‌पलूस) येथे १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनानिमित्त यावर्षीचे ७६ वे कुस्ती मैदान झाले. यावर्षी अंतर्गत राजकीय संघर्षातून दोन‌ कुस्ती मैदान झाले. दोन्ही मैदानात पै. सिकंदर शेख विजयी झाला. बांबवडे च्या कुस्ती मैदानात सिकंदर शेख खऱ्या अर्थाने ‘सिंकदर’ ठरला.‌

  सांगली : बांबवडे (ता. ‌पलूस) येथे १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनानिमित्त यावर्षीचे ७६ वे कुस्ती मैदान झाले. यावर्षी अंतर्गत राजकीय संघर्षातून दोन‌ कुस्ती मैदान झाले. दोन्ही मैदानात पै. सिकंदर शेख विजयी झाला. बांबवडे च्या कुस्ती मैदानात सिकंदर शेख खऱ्या अर्थाने ‘सिंकदर’ ठरला.‌ उत्कर्ष क्रीडा मंडळ व ग्रामपंचायत बांबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मैदान झाले. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी लावलेल्या सात लाख रूपये इनाम असणारी कुस्ती पै सिकंदर शेख विरूद्ध प्रिंस कोहली अशी चाळीस मिनिट जोरदार लढत झाली. यामध्ये सिकंदर शेख यास गुणावर विजयी घोषित करण्यात आले.

  दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती क्रांतिअग्रणी डॉ जी. डी.‌ बापू क्रांति सहकारी साखर कारखान्याच्या वतीने लावण्यात आली. सहा लाख इनामची झाली.‌ पै महेंद्र गायकवाड विरूद्ध विशाल भोडू लढत झाली. यामध्ये पै. गायकवाड गुणावर विजय झाला. चार लाख रूपये इनाम पै. माऊली कोकाटे विरूद्ध राजू रायवाल अशी लढत झाली. ३५ मिनिटांनंतर कोकाटे विजय झाला. एक लाख रूपये इनामी लढत सतपाल सोनटक्के विरूद्ध समीर शेख झाली. यामध्ये सतपाल सोनटक्के बॅक थ्रो डावावर विजय झाला. तिसरी क्रमांकाची लढत ओंकार चौगुले विरूद्ध कालीचरण सोलंनकर यांच्यात झाली. कालीचरण सोलनकर हा घुटना डावावर विजयी झाला. चौथी लढत रविराज चव्हाण विरूद्ध प्रथमेश पाटील यांच्यात झाली. यामध्ये रविराज चव्हाण एकेरी कसावर विजयी झाला. पाचवी लढत कमलजीत विरूद्ध अण्णा यमगर‌ ही लढत बरोबरीत सुटली.

  सहावी लढत सोनबा गोंगाने विरूद्ध अंकुश माने ही कुस्ती बरोबरीत सुटली सातवी कुस्ती अमित सुल विरूध्द भारत पवार यांच्यामध्ये लढत झाली. यामध्ये भारत पवार एकचाक डावावर विजय झाला. आठवी कुस्ती गौरव हजारे विरूद्ध प्रमोद सुळ घुटना डावावर गौरव हजारे विजय झाले. नववी लढत भैया धुमाल विरूद्ध सचिन माने, राहुल काले विरूद्ध सनी मदने बरोबरीत सुटली.

  विश्वचरण सोलंकर विरूद्ध अनिकेत खबाल‌ अनिकेत खबाले डंक्की डावावर विजय झाला. अनिकेत गावड़े विरूद्ध तमा हेलवी तमम्मा जखमी असल्याने अनिकेत विजय घोषित केला. कुस्ती मैदान साठी माजी मंत्री पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरूण लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, पै. चद्रहार पाटील अादी उपस्थित हाेते. ए. डी. पाटील, लालासो पवार, पोपट संकपाळ, विश्वासराव पाटील, पांडुरंग संकपाळ, टाहेर मुल्ला, लक्ष्मण पाटील, हणमंत पाटील, अनिल पवार, मोहन संकपाळ, विजय पवार, जयवंत पवार, मोहन पवार, तोहफीक मुल्ला यांनी परिश्रम घेतले. मैदानाचे समालोचन अभिजीत कदम, विक्रम संकपाळ, वाजे यांनी केले.

  प्रेक्षकांची उत्सुकता ताणली

  पैलवान छोटा जसा अमृतसर याच्यावर केवळ तिसऱ्या मिनिटात समोरून नागपट्टी गावावर विजय मिळवला. या कुस्तीबाबत हजारो प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. सिकंदर शेखने विजय मिळवत उपस्थित हजारो प्रेक्षकांची वाहवा मिळवली. माजी अामदार स्व. संपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ पैलवान सिकंदर शेख गंगावेस विरुद्ध पैलवान छोटा जसा अमृतसर यांच्यात प्रथम क्रमांकाची ७ लाख रुपये इनामाची कुस्ती झाली. बांबवडे कुस्ती मैदान कमिटी यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील कुस्ती हंगामातील पहिले मैदान १५ ऑगस्ट रोजी जयभवानी उद्योग समूहाचे संस्थापक प्रकाश पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांनी मोठ्या जिद्दीने भरवले होते. गाव तळयानजीक लाल मातीतील कुस्ती लोकांना पाहायला मिळाली.

  रेजा आरजी-मंजीत मैलात सामना

  माजी आमदार दिनकर पाटील व स्व. रामचंद्र कृष्णाजी पाटील यांच्या स्मरणार्थ खासदार संजय पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वतीने पैलवान रेजा आरजी (जागतिक विजेता इराण) विरुद्ध पैलवान मंजीत मैला (हरियाणा केसरी) यांच्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती ६ लाख इनामाची कुस्ती झाली.

  माऊली जमदाडेची सोनू दयावर मात

  उद्योजक बाळासाहेब महिपतीराव पाटील यांच्या वतीने सुधीर बाळासाहेब पाटील व मानसिंग सुधीर पाटील यांच्या हस्ते महान भारत केसरी पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध हरियाणा केसरी पैलवान सोनू दया या दोन मल्लांमध्ये झाली. जमदाडेने आकडी लावून पैलवान सोनू दयावर ताबा मिळवला. तेराव्या मिनिटाला एक चाक डावर विजय मिळवला.