छायाचित्र :  स्वप्नील शिंदे
छायाचित्र : स्वप्नील शिंदे

शेमारू मराठी बाणाची नवीन मालिका "सौ. प्रताप मानसी सुपेकर," मधील कलाकार, 'प्रदीप घुले, तन्वी किरण यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. 

    भारतामधे सणासुदीचा काळ म्हणजे कुटुंब आणि मित्रांसोबत आनंद आणि एकत्र येण्याचा काळ. मात्र समाजातील प्रत्येक घटकाला आनंद उपभोगू देणाऱ्या , समाजाची अथक सेवा करणार्‍या आणि संरक्षण करणार्‍या आमच्या पोलिस कर्मचार्‍यांसाठी मात्र या सणासुधीचा अर्थ म्हनजे कर्तव्यासाठी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणे असाच होतो.

    पोलीस दलाच्या असीम त्याग आणि समर्पणाला अभिवादन म्हणून शेमारू मराठीबाणा चँनेलने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला,

    मुंबईच्या परळ येथील भोईवाडा पोलीस ठाण्यातील या सोहळ्याच्या उत्साहात भर घालत, शेमारू मराठीबाणाच्या नवीन मालिकेमधील’ (सौ. प्रताप मानसी सुपेकर,’), प्रतिभावान कलाकार प्रदीप घुले आणि तन्वी किरण यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कर्यक्रमात् सहभाग नोंदवला. समाजाप्रती असणारी बांधिलकी आणि उत्सवाच्या आनंदी भावनेने, प्रदीप आणि तन्वी यांनी रहिवाशांशी थेट संवाद साधला, आणि स्थानिकान्चा आनंद द्विगुणित झाला. या कार्यक्रमामुळे वास्तविक जीवनातील नायकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात हसू आणि आनंदाची भावना निर्माण झाली.

    दोघांही अभिनेत्यांच्या हृदयात या कर्यक्रमाचे विशेष स्थान आहे कारण त्यांनी नायगाव पोलिस क्वार्टरमधील रहिवाशांशी थेट संवाद साधला आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाने पोलीस अधिकारी आणि त्यांच्या जोडीरांना त्यांच्या आयुष्यातील भावनिक क्षण शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले कार्यक्रमा दरम्यान अभिनेत्यांनी पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू आणि दिवाळी फराळचे वाटप केले तसेच कौतुकाचा भाग म्हणून एक छोटस बक्षिस चिन्ह दिले .

    सौ प्रताप मानसी सुपेकर मालिकेत प्रदीप आणि तन्वी यांची भेट मालिकेचे’ महत्व दर्शवते. एकत्रित आणि मजबूत नातेसंबंधांच्या महत्त्वावर भर देणारी ही मालिका असुन् दिवाळीचा सण साजरा करण्याचा , समाजामध्ये एकता, प्रेम आणि आनंदाचा संदेश देण्याचा हा एक सुंदर मार्ग असल्याची प्रतिक्रिया या वेळी पोलीस बांधवानी दिली

    शेमारू मराठीबाणा मुंबई व्यतिरिक्त पुणे आणि सांगली येथील पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांमधे सुद्धा दिवाळीचा आनंद पस्रवणार असुन लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे समजते. दिवाळीच्या वेळी उत्साह आणि कृतज्ञता फैलविण्यात शेमारू मराठीबाणा बरोबर जुडून राहा! अशी हाक यावेली उपस्थित कलाकारानी दिली.