शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी प्रदीप शंकर महाशिकारे (वय ४६) पद भुकर मापक वर्ग ३ भूमी अभिलेख शेवगाव हा कर्मचारी या पथकाने ८ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडला.

    शेवगाव : शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी प्रदीप शंकर महाशिकारे (वय ४६) पद भुकर मापक वर्ग ३ भूमी अभिलेख शेवगाव हा कर्मचारी या पथकाने ८ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडला. तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे अमरापूर ता.शेवगाव शिवारातील शेत गट नं १८० मध्ये असलेल्या २१ गुंठे जमिनीची भूमी अभिलेख कार्यालाकडून मोजणी करून घेतली होती. मोजणीनुसार खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यात आल्या होत्या. त्याचा सुधारित नकाशा देण्याकरीता त्यातील आरोपी लोकसेवक हे रुपये १० हजार रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागास प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सोमवार दि.१४ लाचलुचपत अधिकारी यांच्या टाकलेल्या छाप्यात तडजोडी अंती ८ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यावरून आज दि.१४ नोव्हेंबर रोजी शेवगाव ताजनापूर रोडवरील स्मशान भूमीजवळ हा लाचेचा सापळा लावण्यात आला. त्यातील आरोपी लोकसेवकाने ८ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले व आरोपीस रंगेहात पकडण्यात आले. या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सुनील कडासने सो.पोलीस अधीक्षक ला.प्र.वी.नाशिक परिक्षेत्र नाशिक, नारायण न्याहळदे सो.अपर पोलीस अधीक्षक नाशिक, अहमदनगर जिल्ह्याचे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा निरीक्षक अधिकारी गहिनीनाथ गमे, ला.प्र.वि. अहमदनगर, सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक ला.प्र.वी.अहमदनगर पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गुंगर, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, रवींद्र निमसे , सचिन सुद्रक, आसाराम बटुळे, चालक पो.ह.हरून शेख यांच्या पथकाने केली.