वेश्याव्यवसायावर शिक्रापूर पोलिसांचा छापा; तीन महिलांसह 2 लॉजचालकांना घेतले ताब्यात

शिक्रापूर येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत तिघा महिलांसह दोन लॉज चालकाला ताब्यात घेतले आहे.

    शिक्रापूर : शिक्रापूर येथील पाबळ चौकातील एका लॉजवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय वर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत तिघा महिलांसह दोन लॉज चालकाला ताब्यात घेतले असून, अमरेंद्र दुकबंधू साहू व संतोष लुकोनाथ बेहरा या लॉज चालकांवर गुन्हे दाखल करत तिन महिलांची महिला सुधार गृहात रवानगी केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

    शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे असलेल्या बालाजी लॉजवर बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस शिपाई प्रताप कांबळे, महिला पोलीस नाईक राणी भागवत, महिला पोलीस शिपाई दिक्षा कांबळे यांनी सदर वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता, त्यांना सदर ठिकाणी दोन लॉज चालकांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिला मिळून आल्या, दरम्यान पोलिसांनी तिघा महिलांना ताब्यात घेत चौकशी केली असता लॉजचालक अमरेंद्र साहू व संतोष बेहरा यांनी आम्हाला वेश्याव्यवसाय साठी ठेवले. ते आम्हाला वेश्याव्यवसायसाठी प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले.

    दरम्यान पोलिसांनी दोन लॉज चालकांकडे चौकशी केली असता, आम्ही दोघांनी संगनमताने महिलांना वेश्याव्यवसायसाठी ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांच्या पथकाने तिन महिलांसह दोघा लॉज चालकांना ताब्यात घेतले असून, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव श्रीरंग पवार (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी लॉज चालक अमरेंद्र दुकबंधू साहू (वय ३८) व संतोष लुकोनाथ बेहरा (वय ३४) वर्षे दोघे सध्या ( रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. गुरुजन गल्ली धेकानाल ओरिसा) या दोघांसह तिघा महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अमरेंद्र दुकबंधू साहू व संतोष लुकोनाथ बेहरा या दोघांना दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे तसेच तिन महिलांची सुधार गृहात रवानगी करण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.