नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांना भिडले! शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाचा हवेत गोळीबार, वाद नेमका काय?

नाशिकच्या देवळाली गावात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला. यावेळी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडाली

    नाशिक : विधानभवनात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचा अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (udhhav thackeray) यांच्या नावाचा नसण्यावरु आधीच ठाकरे गट आणि शिंदे गटात तणावाच वातावरण असताना आता पुन्हा या दोन्ही गटामधलं वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहे. नाशिकमध्ये शिंदे गट (eknath shinde) आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    नाशिकच्या देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे सह पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते. दरम्यान पोलिसांनी संशयित स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटने नंतर देवळाली गावांत तणाव पूर्ण शांतता आहे.