ज्युदो स्पर्धेत शिंदे महाविद्यालयाच्या मुलींची बाजी ; मुलांचा संघ उपविजेता 

यशस्वी खेळाडूंचा सन्मान

    श्रीगोंदा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयोजित अहमदनगर जिल्हा आंतरमहाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजेता तर मुलांचा संघ उपविजेता झाला. मुलींच्या संघामध्ये कु. साक्षी इंगळे (५२ ते ५७ किलो) प्रथम , कु.पल्लवी पोटफोडे (६३ ते ७० किलो) प्रथम , कु. सिद्धी होळकर, (७८ किलो खुला गट ) प्रथम तसेच मुलांच्या संघामध्ये श्रेयश होळकर (१०० किलो खुला गट) प्रथम व आघाव तुकाराम (१०० किलो खुला गट) द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

    या यशस्वी खेळाडूंचे माजी मंत्री व विद्यमान आमदार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीरशेट पटवा, माजी आमदार व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के सीनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, ज्युनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा.संजय अहिवळे, शा. शि. संचालिका प्रा. बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ, हनुमंत फंड व संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले.