शिंदे गटातील शिवसेना युवासेनेचे शिलेदार जाहीर

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतु, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला वेगवेगळ्या कारणांनी सतत आव्हान देण्यात येत आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या कार्यकारिणीत शिंदे गटातील नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आल्याचे कार्यकारिणीतील नावांवरून दिसून येत आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना या कार्यकारिणीत संधी देण्यात आली आहे.

    एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. परंतु, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला वेगवेगळ्या कारणांनी सतत आव्हान देण्यात येत आहे.

    युवा सेना कार्यकारणी सदस्य

    उत्तर महाराष्ट्र :
    अविष्कार भुसे

    मराठवाडा :
    अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील

    कोकण :
    रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
    विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे

    पश्चिम महाराष्ट्र :
    किरण साली, सचिन बांगर

    कल्याण भिवंडी :
    दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक

    ठाणे, नवी मुंबई व पालघर :
    नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे

    मुंबई :
    समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे

    विदर्भ :
    ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील