शिंदे- फडणवीस सरकारला पालकमंत्री नेमण्याचा मुहूर्त सापडत नाही : दिलीप वळसे पाटील

सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाले तरी, अजून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री या सरकारने नेमला नाही. त्यांना कशाची भिती वाटते कळत नाही, या गोष्टीला मुहूर्त सापडत नाहीये. असे राज्याचे माजी गृहमंत्री पाटील दिलीप वळसे पाटील म्हणाले.

    पुणे : राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन होऊन १०० दिवस झाले तरी, अजून प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री या सरकारने नेमला नाही. त्यांना कशाची भिती वाटते कळत नाही. या गोष्टीला मुहूर्त सापडत नाहीये. असे राज्याचे माजी गृहमंत्री पाटील दिलीप वळसे पाटील म्हणाले. आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी होणाऱ्या साखरेची बैठक पार पडली. त्यानंतर पाटील यांनी संवाद साधला.

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाली आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना नव्या कार्यकारणीत स्थान देण्यात आलं आहे, मात्र मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्य प्रवक्ते पदावरून दूर केले आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, मलिक यांच्या मुलीला प्रवक्ता पद दिलेलं आहे.

    जिल्ह्याला अजून पालकमंत्री नेमला नाही. त्यामुळे जिल्ह्याचे नुकसान होत आहे, जो निधी जिल्हा नियोजनासाठी येतो तो लॅप्स होईल, नागरिकांच नुकसान होईल, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.