शिंदे फडणवीस सरकार येत्या पाच ते सहा महिन्यांत कोसळेल सुषमा अंधारेंच वक्तव्य

ज्या सरकारातील आमदारांना पालकमंत्री विश्‍वासात घेत नसतील, त्यांना किंमत देत नसतील, त्यांना जाणीवपूर्वक पक्षपात करत असतील, तर सरकारात धुसफूस होणे साहजिक आहे. असं त्या म्हणाल्या.

    कोल्हापूर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. विरोधकांवर परखडपणे टिका करण्याची एकही संधी त्या सोडत नाही. आता पुन्हा त्यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर टिका केली आहे. भारतीय जनता पार्टीत आयारामांना स्थान दिले जात असून निष्ठावंताना बाजूला केले जात आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने जाणीवपूर्वक बाजूला केले, त्याचप्रमाणे असे अनेक नेते पक्षात दुखावले आहेत, असा आरोप करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येत्या पाच ते सहा महिन्यांत कोसळेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

    शिवसेना नेत्या सुषमा अंधारे काल महाप्रबोधन यात्रेनिमित्त कोल्हापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीत शेरेबाजी केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यामधील नाराजी नाट्यासंदर्भात वक्तव्य केलं.  त्या म्हणाल्या, ‘‘ज्या सरकारातील आमदारांना पालकमंत्री विश्‍वासात घेत नसतील, त्यांना किंमत देत नसतील, त्यांना जाणीवपूर्वक पक्षपात करत असतील, त्यांच्यामध्ये नाराजी होणं हो स्वावाभिक आहे.  आमदार सुहास कांदे यांनी अलीकडेच पालकमंत्री दादा भुसे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तर, आमदार रवी राणा हे देखील बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. खोक्यांप्रकरणी केस दाखल करायची झाल्यास प्रथम राणांवर करावी लागेल.’’ असं त्या म्हणाल्या.