शिंदे-फडणवीस सरकारचं MPSC विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट, MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे.

    मुंबई – mpscचा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करणार आहे, त्यामुळे शिंदे – फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यांची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या बातमीमुळे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    आज पुण्यात झाले होते आंदोलन

    दरम्यान, पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.