शिंदे फडणवीसांचे सरकार हे स्थगिती सरकार; अजित पवार यांचे टीकास्त्र

शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची (Mla) पळवापळवी करुन राज्यात (State) सत्तेवर आलेले शिंदे - फडणवीस (Shinde- Fadanvis) यांचे सरकार म्हणजेच स्थगिती सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळातील चांगल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा एककलमी कार्यक्रम यांनी राबवला. त्यांच्या आमदारांना मात्र बोलवून घेऊन निधीची अक्षरक्ष: खैरात केली जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

  तासगाव : शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची (Mla) पळवापळवी करुन राज्यात (State) सत्तेवर आलेले शिंदे – फडणवीस (Shinde- Fadanvis) यांचे सरकार म्हणजेच स्थगिती सरकार आहे. महाविकास आघाडीच्या काळातील चांगल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा एककलमी कार्यक्रम यांनी राबवला. त्यांच्या आमदारांना मात्र बोलवून घेऊन निधीची अक्षरक्ष: खैरात केली जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

  शुक्रवारी मणेराजुरीत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन सरपंचासह उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

  मेळाव्यास आमदार सुमन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक सुरेश पाटील, अनिता सगरे, अविनाश पाटील, ताजूद्दीन तांबोळी, हणमंतराव देसाई, विश्वास पाटील, दत्ताजीराव पाटील, महेश पवार, चंद्रकांत हक्के, शंकर पाटील, शंतनू सगरे यांच्यासह राष्ट्रवादी काॅग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  अजित पवार म्हणाले, आर आर आबांच्या पश्चात जनता त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पवार घराणे आबा कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे राहील असा मी शब्द देतो.

  रोहित पाटील म्हणाले, आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, आर. आर. आबांच्या कुठल्या कार्यकर्त्याला हात लावला, तर रोहित पाटीलला हात लावला असे समजावे”, असा इशारा, त्यांनी खासदार संजय पाटील यांना नाव न घेता दिला.

  रोहित पाटील यांनी यावेळी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. आज तुम्ही जरी विरोधीपक्ष नेते असला तरी तुम्ही आमच्यासाठी मुख्यमंत्री आहात, अशा शब्दात अजित पवारांचे कौतुक केले. उगवता सूर्य मावळायला आलाय, आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय, असे रोहित म्हणाले.

  या राज्यात कुठलंही सरकार असले, तरी अजितदादा काम करू शकतात. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रासाठी दादा असाल, पण तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी तुम्ही आबा आहात. त्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. मतदारसंघातील लोकांचे कौतुक करताना यांचं पाय धुवून पाणी प्यालो, तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. आबांना या लोकांनी खूप साथ दिली आहे. या मातीनं आमच्यावर उपकार केले आहेत. आबांचा मुलगा म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत उपकार विसरणार नाही.

  आबांचे स्वप्न साकारणार : रोहित पाटील

  आर आर आबा यांचे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही एम.आय.डी.सी उभी करण्याचा प्रयत्न करतोय. परंतू या जागेवर विमानतळ आणणार असल्याच्या अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. अशी दुटप्पी भूमिका या मतदारसंघातील जनता कदापीही खपवून घेणार नाही. कोणीही आडवे आले तरी अलकुड-मणेराजुरी ही मिनी एमआयडीसी उभी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही रोहित पाटील यांनी दिली.

  ‘आरे ला कारे करा’ : अजित पवार

  यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, या मतदारसंघातील काहींना सत्तेचा व पैशाचा माज आलेला आहे. ते ‘मसल पाॅवर’ दाखवत आहेत, पण आपणही गप्प बसायचं नाही, ‘आरे’ ला कारे म्हणायची हिम्मत तुमच्यामध्ये ठेवायला शिका. आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहू.

  माफी मागायला मोकळा नाही, स्वराज्यरक्षकच

  या कार्यक्रमात अजित पवार यांनी संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर ऐवजी स्वराज्य रक्षक केलेल्या मताशी आपण ठाम असल्याचे सांगितले. स्वराज्यरक्षक शब्दात संयम, स्वराज्य आणि धर्म या गोष्टी येतात. ‘मी माफी मागायला मोकळा नाही, स्वराज्य रक्षक म्हणजे स्वराज्य रक्षकच, असे वक्तव्य केले.

  सांगलीचे पार्सल डिपॉझिट जप्त करून पाठवले

  या कार्यक्रमात अजित पवार यांनी नाव न घेता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रखर टीका केली. आर आर आबांसारखा माणूस तुम्हाला लाभला. हेच तुमचे भाग्य आहे. परंतू तुम्ही कधीच आर. आर. आबा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेले नाही. पण माझे बघा. दीडलाख मताधिक्याने निवडून आलो आहे. तुमच्या जिल्ह्यातून आलेले पार्सल डिपॉझिट जप्त करून परत पाठवले.