वेदांता बाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार, मविआ सरकारबाबत संभ्रम निर्माण करू नका – अजित पवार

आमच्या सरकारमुळे प्रकल्प हातातून गेला असा प्रचार करत आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे, यंत्रणा आहेत. त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमांतून चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं अजित पवारांनी ठणकावले आहे.

    मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेला आहे, त्यामुळं सध्या राज्यात वेदांत प्रकल्पावरुन बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. यावरुनच आता विरोधक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचे काम करत आहेत, तर शिंदे फडणवीस (Shinde fadnvis government) सरकारने मविआ सरकारवर टिका करताना वेदाता प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास मविआ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

    दरम्यान, काहीजण उगाच बेरोजगार तरुणांमध्ये अफवा पसरवत आहेत. आमच्या सरकारमुळे प्रकल्प हातातून गेला असा प्रचार करत आहेत. त्यांच्या हातात सरकार आहे, यंत्रणा आहेत. त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमांतून चौकशी करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं अजित पवारांनी ठणकावले आहे. दरम्यान, मोदी-शाह (modi shah) यांच्या इशाऱ्यावरच एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे काम करत आहेत, असं सुद्धा अजित पवार म्हणालेत. शेवटपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा याकरता प्रयत्न सुरू होते. पण सध्या कारण नसताना संभ्रामवस्था निर्माण केली जातेय. पैशांची मागणी केल्याचा आरोप केला जातोय. ज्यांनी असा आरोप केला आहे, त्यांच्या हातात सत्ता, यंत्रणा आहे, त्यांनी चौकशी लावावी  म्हणजे खरे खोटे काय आहे, हे समोर येईल असे खडे बोल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.