कामाची बातमी! शिंदे सरकारने घेतलाय कर्मचाऱ्यांच्या भल्याचा निर्णय, पण खासगीत लागू होणार का? वाचा सविस्तर प्रकरण

शिंदे सरकार (Shinde Government) सत्तेत आल्यापासून त्यांनी एकापाठोपाठ एक असे तात्काळ निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. मविआ सरकारने (MVA Government) घेतलेल्या काही निर्णयांमध्येही त्यांनी काही तांत्रिक बदल केले. त्याचा अर्थातच जनतेला फायदाच होणार आहे.

    मुंबई : २०१४ साली महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सरकारी कर्मचाऱ्यांचा (Government Employees) भविष्य निर्वाह निधी (Pension) बंद करण्याचा निर्णय घेतला होता (descision to close the pension). तेव्हापासून आजतागायत या काळात सरकारी सेवेत नव्याने भरती होणाऱ्या (New Recruitment) सरकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला नव्हता. तत्कालीन सरकारने ही संकल्पनाच मोडीत काढली होती.

    शिंदे सरकार (Shinde Government) सत्तेत आल्यापासून त्यांनी एकापाठोपाठ एक असे तात्काळ निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. मविआ सरकारने (MVA Government) घेतलेल्या काही निर्णयांमध्येही त्यांनी काही तांत्रिक बदल केले. त्याचा अर्थातच जनतेला फायदाच होणार आहे.

    नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की, १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली दिनांक १ एप्रिल २०१५ पासून लागू करीत आहे.