शिंदे गटातील कार्यकर्त्याचा मेळाव्यासाठी येत असताना प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबईला दसरा मेळाव्याला येत असताना, शिंदे गटातील कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. श्रीकृष्णा मांजरे (Shrikrishna Manjare) असं मृत कार्यकर्त्याचं नाव आहे. यवतमाळहून (Yavatmal) मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी येत असताना या कार्यकर्त्याचा प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने श्रीकृष्णा मांजरे या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    यवतमाळ – एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर व मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी तसेच यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार आहे, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. राज्याच्या राजधानीत आज अटीतटीचा शिवसेना व शिंदे गटात सामना होत आहे. त्यामुळं गर्दीची स्पर्धा कोण जिंकणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले असताना, राज्यभरातून लोकं मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी येत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी येत असताना एक दुर्घटना घडली आहे.

    मुंबईला दसरा मेळाव्याला येत असताना, शिंदे गटातील कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. श्रीकृष्णा मांजरे (Shrikrishna Manjare) असं मृत कार्यकर्त्याचं नाव आहे. यवतमाळहून (Yavatmal) मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी येत असताना या कार्यकर्त्याचा प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने श्रीकृष्णा मांजरे या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिंदे गटातील हा कार्यकर्त्या मुंबईला दसरा मेळाव्यासाठी येत असताना या कार्यकर्त्यांवर काळाने घाला घातला, त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.