शिंदे गट आणि दलित पँथर एकत्र येणार? चर्चांना उधाण

ठाकरे गट व वंबआ एकत्र येणार यानंतर आता शिंदे गट (Shinde Group) व दलित पँथर (Dalit Panthers) एकत्र येणार असल्यांच बोललं जात आहे. ठाकरे- आंबेडकर युतीला शह देण्यासाठीच शिंदे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबरला कराडमध्ये दलित पँथरच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

    मुंबई – राज्यात चार महिन्यापूर्वी सत्तांतर झाले आहे. शिंदे बंडाळी गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर ठाकरे गटाला सोडून जाण्याऱ्यांची संख्या वाढत असून, ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाहीय. दरम्यान, ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी आगामी पालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रविवारी एकाच मंचावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेतही दिलेत. त्यामुळे शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत निवडणूक लढणवार आहे, असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, ठाकरे गट व वंबआ एकत्र येणार यानंतर आता शिंदे गट (Shinde Group) व दलित पँथर (Dalit Panthers) एकत्र येणार असल्यांच बोललं जात आहे. ठाकरे- आंबेडकर युतीला शह देण्यासाठीच शिंदे गटाकडून ही खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच 25 नोव्हेंबरला कराडमध्ये दलित पँथरच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटासोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ शिंदे गटाला भेटून युतीचा प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलं जातय.