due to Ramdas Kadams resignation Will affect Shiv Senas bow and arrow go astray nrvb

काही दिवसांपूर्वी दापोलीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करत बोचरी टिका केली होती. या कारणामुंळ रामदास कदमांच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून, रामदास कदमांच्या (Ramdas kadam) शिवसैनिकांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

    दापोली : शिंदे गटाने बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालेय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. दरम्यान, आमदारांच्या (MLA) बंडानंतर खासदार तसेच नगरसेवक व पदाधिकारी यांनी सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यानंतर राज्यात नवे सरकार येऊन आता तीन चार महिने होत असताना, कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शिंदे गट व शिवसैनिकांमध्ये राडा होत असतो. आता कोकणातील दापोलीमध्ये (Dapoli) शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. (Shinde group and shivsainik)

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी दापोलीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंचा (Udhav Thackeray) एकेरी उल्लेख करत बोचरी टिका केली होती. या कारणामुंळ रामदास कदमांच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले असून, रामदास कदमांच्या (Ramdas kadam) शिवसैनिकांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आले असल्यामुळं वातावरण तंग झालेय. दोन गटात बाचाबाची झाल्याने दोन गटात पोलिसांची मध्यस्थी करत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिक आक्रमक होत रामदास कदमांच्या शिवसैनिकांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कदमांच्या विरोधात घोषणाबाजी केली.