“शिंदे गटाचे ‘खोके’ राजकारण! हरामखोरांची राजकीय चिता पेटेल…”; शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा निर्धार; सामनातून शिंदे गटावर शेलक्या शब्दात टिका

महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल.” अशी सामनातून शिंदे गटावर टिका करण्यात आली आहे. विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंगच आहे, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.

    मुंबई- आज हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती यानिमित्त सामना (Saamana) अग्रलेखातून शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. “आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उतलेले–मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल.” अशी सामनातून शिंदे गटावर टिका करण्यात आली आहे. विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंगच आहे, असा हल्ला अग्रलेखातून चढवण्यात आला आहे.

    हरामखोरांची राजकीय चिता पेटेल

    दरम्यान, “मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली! विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंगच आहे, दैनिक सामनातून या तैलचित्र अनावरण सोहळ्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

    मग बाळासाहेबांचे नाव का घेता?

    ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेईमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणतं चित्रं रंगवत आहात? आमचे नाते मोदींशी आहे असं सांगणारे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव का घेत आहेत? विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचं ढोंग रचलंय ते कशासाठी? एक तर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही. असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

    ४० बेईमानांच्या ढोंगाशिवाय…

    विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा आणि तेज नसल्याने ४० बेईमानांच्या ढोंगाशिवाय या सोहळ्यात दुसरे काहीच दिसत नाही. तसेच बाळासाहेब ठाकरे हे पुण्यवान अमर आत्मा आहेत. त्यांचे चित्रं लोकांच्या हृदयावर कोरले गेले असून ते प्रामाणिक आहे. स्वाभिमानाचा कुंचला आणि निष्ठेच्या रंगाने हे चित्र अमर झाले आहे. असा हल्लाही सामना अग्रलेखातून शिंदे गटावर चढवण्यात आला आहे.