भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, डोकं नासलेलं, रामदास कदमांची टीका

रामदास कदम यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा, अशी खोचक टीकाही भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली होती. त्यावर आता कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई – “भास्कर जाधव यांचा मेंदू सडलेलं असून, त्यांचे डोके नासलेलं आहे. त्या नासक्या डोक्यात नासकेच विचार येतात. त्यामुळे त्यांचे डोके डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. तसेच भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही”, अशी खरमरीत टीका शिंदे गटाचे आमदार तसेच मंत्री रामदास कदम यांनी केली शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.

    रामदास कदम यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा, अशी खोचक टीकाही भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली होती. त्यावर आता कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    रामदास कदम म्हणाले की, “काही दिवसांत भास्कर जाधव लोकांना दगड मारेल, अशी त्यांची अवस्था झाली आहे. जो एक पक्षाचा नेता आहे तो स्टेजवर नाचतोय हे जनतेने पहिल्यांदा पाहिलेय. उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी भास्कर जाधव हे माझ्यावर टीका करतायेत. हे दाखवण्याचा बालिश प्रयत्न आहे, त्यांना कोणीही भीक घालणार नाही. राज्यातील जनता थू-थू करत त्यांच्यावर हसते. नाचक्या डोक्याच्या विचाराच्या माणसाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता नाही.”

    पुढे भास्कर जाधववर टीका करताना कदम म्हणाले की, “कुत्ता भौंकता है, हाथी अपनी चाल चलता है, भोकणेवाला कुत्ता कभी काटता नही, म्हणून अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.”