मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळतोय; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठोपाठ ‘या’ आमदाराचा राजीनामा

मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

    संभाजीनगर : मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. त्यात अनेक राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ शिंदे गटाचेच आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांनी राजीनामा दिला आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण केले जात आहे. त्याला हजारो मराठा बांधवांकडून पाठिंबा दिला जात आहे. असे असताना याच मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी देखील राजीनामा दिला.

    त्यांच्यानंतर आता रमेश बोरणारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रमेश बोरणारे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पाठवला असल्याची माहिती दिली जात आहे.