पंतप्रधानांसाठी शिंदे गटातील आमदाराची धक्कादायक प्रतिज्ञा; ‘भर चौकात घेईल फाशी…’

2024 ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भर चौकात फाशी घेईन अशी प्रतिज्ञा आमदार संतोष बांगर यांनी केली.

    मुंबई : शिवसेना (Shivsena) शिंदे गटातील आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेच्या वर्तुळामध्ये असतात. अनेकदा ते वादग्रस्त विधान करताना दिसून येतात. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल  (MLA Disqualification Case) शिंदे गटाकडून देण्यात आला. कोणतेही आमदार अपात्र ठरले नसले तरी शिवसेनेची धुरा ही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे सोपवल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. मात्र शिंदे गटाने (Shinde group) सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये निर्णयाचे स्वागत केले. यावेळी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेले वक्तव्य चर्चेमध्ये आले आहे.

    माध्यमांशी संवाद साधताना संतोष बांगर म्हणाले, “प्रत्येकाला माहिती आहे की, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीलाच आपल्याला निवडुन द्यायचं आहे. छाती ठोकून सांगतो. २०२४ चा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. एप्रिलमध्ये आगामी लोकसभेची निवडणूक आहे. छाती ठोकून सांगतो, २०२४ ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भर चौकात फाशी घेईन” अशी प्रतिज्ञा आमदार संतोष बांगर यांनी केली.

    राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर शिंदे गटाने राज्यभर जल्लोष केला, वाजत गाजत आणि एकमेकांना मिठाई भरवत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र निर्णय घेणारे विधानसभा अध्यक्ष पक्षपाती असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निर्णयानंतर हिंगोली मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर भर चौकात फाशी घेईल अशी धक्कादायक प्रतिज्ञा केली.