शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, ‘आम्ही बंड केलं नाही तर बाळासाहेबांच्या विचारांचा…’

शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) हे निवडणूक चिन्ह कोणाचं यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात चढाओढ सुरु आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. आज या दोन्ही गटांना निवडणूक आयोगापुढं लेखी युक्तिवाद दाखल करण्याचे सांगण्यात आले होते.

    मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) हे निवडणूक चिन्ह कोणाचं यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात चढाओढ सुरु आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे. आज या दोन्ही गटांना निवडणूक आयोगापुढं लेखी युक्तिवाद दाखल करण्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी भाष्य केले. ‘आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचाच उठाव केला आहे’, असे ते म्हणाले.

    राहुल शेवाळे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) ही योग्य मार्गावर आहे. अरविंद सावंत यांना दोन घटना आहेत हे माहीत नसेल. उद्धव ठाकरेंनी वेगळी घटना तयार केली होती. ही घटना जेव्हा तयार केली गेली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. एखादं बंड किंवा उठाव होतो तो काही एका दिवसात होत नाही. आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचाच उठाव केला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि आमदारांच्या मनात ही भावना होती. ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो त्यावरून आम्ही हा निर्णय घेतला आहे.

    उद्धव ठाकरेंनी जी घटना तयार केली ती वेगळी

    जी कायदेशीर बाजू आहे ती आम्ही निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी घटना तयार केली होती ती वेगळी घटना होती आणि उद्धव ठाकरेंनी जी घटना तयार केली ती वेगळी आहे. त्यामुळे अरविंद सावंत काय आरोप करतात ते करू द्या आम्ही जुन्या घटनेप्रमाणेच एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवडलं आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेता पद हे घटनात्मक आहे हे आम्ही निवडणूक आयोगासमोर सांगितलं आहे.