balsanvardhan shibir shivsena

शहराच्या चाकोरीबद्ध जीवन व सिमेंटच्या जंगलातून दूर,गर्द वनराईने नटलेल्या निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मुलांना मिळावी, त्यातून काही नवीन शिकता यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा बलसंवर्धन शिबिरामागचा (Balsanvardhan Shibir) उद्देश आहे.

    कल्याण: शिवसेनेच्या (Shivsena) दोन गटातील वादात अनेक शाखांवर, पारंपरिक आंदोलनांवर, कार्यक्रमांवर एकमेकांकडून दावा करण्यात येत असतानाच कल्याणच्या शिवसेना शहर शाखेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांकरिता घेण्यात येत असलेले बलसंवर्धन शिबीर (Balsanvardhan Shibir) ठाकरे गटाने असमर्थता दर्शविल्याने शिंदे गटाने हायजॅक केले आहे. आज या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या बसेसला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

    यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक मोहन उगले, आयोजक समीर देशमुख यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

    शहराच्या चाकोरीबद्ध जीवन व सिमेंटच्या जंगलातून दूर,गर्द वनराईने नटलेल्या निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मुलांना मिळावी, त्यातून काही नवीन शिकता यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा बलसंवर्धन शिबिरामागचा उद्देश आहे. बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शहर शाखा व शिवकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बलसंवर्धन शिबीर २०२२ चे आयोजन २४ ते २७ डिसेंबर दरम्यान आसनगाव येथील माऊली गडाच्या पायथ्याशी करण्यात आले आहे. या शिबिरात ८ ते १२ वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येतो.

    या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगणे, तंबूत राहून निसर्गाचा आनंद घेणे, एअरगनने नेमबाजी, पदभ्रमण, घोडेस्वारी, पक्षीनिरीक्षण, कवायत, जंगल भ्रमंती, सायंकाळी प्रार्थना, कथाकथन, अंताक्षरी, शेकोटी आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात येतात. या बलसंवर्धन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळत असल्याची माहिती यावेळी शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.