शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या माजी माजी नगरसेविकेला फोन, कार्यकर्त्याने खडसावले, उद्धव ठाकरेंकडून कौतुक

जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

    ठाकरे गट : महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) वर्षभरापासून काही आलबेल नाही, अशीच परिस्थिती आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये चांगलाच वर्ड वॉर पाहायला मिळतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी चांगलीच कंबर कसली असून त्यासाठी तयारी सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका कल्पना महाजन यांचं नाव चक्क शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये आहे म्हणून त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फोन आला होता.

    फोन केलेल्या महिलेला कार्यकर्त्यांने चांगलेच खडसावले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निष्ठावान शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी फोन करून कौतुक केले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतोय. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका कल्पना महाजन यांचं नाव चक्क शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीत असून त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फोन आला होता. मात्र हा फोन संबंधित माजी नगरसेविकेचे पती तथा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी उचलला. खासदार शिंदे यांच्या कार्यातून बोलत असून तुमच्या पत्नीचे नाव हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीत आले आहे असे त्यांना फोन करणाऱ्या महिलेने सांगितले.

    फोन करणारी महिला म्हणाली की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार नावे व्हेरिफिकेशन करत असल्याच संबंधित महिलेने फोनवर बोलताना सांगितलं. उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी फोनवर बोलणाऱ्या महिलेला चांगलाच खडसावलं. “माझे नाव ठाकरे गटात असताना माझ्या पत्नीला तुम्ही शिंदे गटात कसे घेता? पक्ष फोडला आता माझ्या बायकोला पण फोडून टाकले का? तुम्ही माझ्या घरात वाद लावून टाकला”, असे म्हणत संबंधित महिलेला उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी चांगलच खडसावले. दरम्यान संबंधित संभाषणाचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले. ही व्हायल ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी देखील ऐकली. त्यानंतर एरंडोल मधील निष्ठावान शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी फोन करून कौतुक केले.