शिंदे गट दादरमध्येच नवे सेनाभवन उभारणार; सदा सरवणकर यांची माहिती

सातत्याने शिंदे गट ठाकरेंना दणका देत असून याबद्दल आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली आहे. आज एक आभास निर्माण केला जातोय की मुंबईवर ठाकरे गटाचे राज्य आहे. मुंबईतल्या जनतेचे, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही, असे ते म्हणाले.

    मुंबई : ठाकरे गटाला (Thackeray Group) आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट (Shinde Group) मुंबईत नवे सेना भवन (New Shivsena Bhawan) उभारणार आहे. दादरमध्येच हे नवे सेना भवन उभारले जाणार असल्याची माहिती सदा सरवणकर (Sada Sarwankar) यांनी दिली. सातत्याने शिंदे गट ठाकरेंना दणका देत असून याबद्दल आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली आहे. आज एक आभास निर्माण केला जातोय की मुंबईवर ठाकरे गटाचे राज्य आहे. मुंबईतल्या जनतेचे, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला (Unemployed) नोकरी मिळाली नाही.

    सरवणकर पुढे म्हणाले की, आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जाणार असून शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचे एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील, असेही सरवणकर म्हणाले.