
आम्ही मुंबईत ठाकरे गटाला पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाहीये. तसेच त्यांच्या बॉम्बचे आवाज ऐकू येत नाहीत, राऊत बॉम्बची भाषा बोलताहेत, पण गौप्यस्फोट किंवा लंवगी मिरची किंवा बॉम्बचा आवाज ऐकू आला नाही, असा चिमटा गोगावले यांनी काठला.
नागपूर : सध्या शिंदे-फडणवीस सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे, तर आजचा नववा दिवस आहे. उद्या अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्यामुळं, उद्या सूप वाजणार आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं वादळी ठरत आहे, सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे तसेच अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होताना दिसत आहेत. यावरुनच सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येताहेत. दरम्यान, उद्या अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. पण याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाला सावधनतेचा इशारा दिला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपुरात येऊन राजकीय बॉम्बस्फोट करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, गेल्या तीन दिवसात राऊत यांनी एकही गौप्यस्फोट न केल्याने आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाची खिल्ली उडवली जात आहे. तसेच आता आमचे बॉम्बस्फोट बघा असं शिंदे गटाचे नेते व आमदार भरत गोगावलेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना गोगावले म्हणाले की, आम्ही मुंबईत ठाकरे गटाला पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाहीये. तसेच त्यांच्या बॉम्बचे आवाज ऐकू येत नाहीत, राऊत बॉम्बची भाषा बोलताहेत, पण गौप्यस्फोट किंवा लंवगी मिरची किंवा बॉम्बचा आवाज ऐकू आला नाही, असा चिमटा गोगावले यांनी काठला. त्यामुळं आता आमच्या बॉम्बचे आवाज ऐका…आम्ही मुंबईत राजकीय हादरे देणार असल्याचा इशारा आमदार गोगावले यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
माझ्याकडे स्फोट करण्यासारखी प्रकरणं आहेत. येत्या दोन दिवसात ही वस्तुस्थिती समोर येईल. त्यानंतर तुम्हाला पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत फटाके वाजताना दिसतील, असा दावाही गोगावले यांनी केला आहे. दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेतना, आम्ही बॉम्बशोधक पथक आणलंय अशी खिल्ली उडविली. ठाकरे गटाचे नेते काहीच बोलत नाहीत, फक्त बॉम्ब आहे, बोलताहेत आवाज किंवा स्फोट झालेला दिसत नाही. स्फोटातला दारुगोळा संपलाय हे समजून घ्या, मात्र आमच्या फटाके आणि बॉम्बचा आवाज आगामी काळात दिसेल, असा इशारा भरतशेठ गोगावले यांनी दिला.