भंडारा जिल्ह्यात १७ पैकी ११ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय

आता या निवडणुकांचा निकाल अंतिम टप्प्यात आले असून, भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्याच्या १७ ग्रामपंचायती करिता झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यातील ११ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपला झेंडा फडकवला आहे.

    भंडारा : राज्यात १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Election) काल मतदान झाले होते. राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीचा निकाल आज लागत आहे. या निवडणुकीत एकूण ७४ टक्के मतदान झालं होतं. राज्यात सत्तांतरनंतर पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक होत असल्यामुळं सर्व पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची व प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात, यावरून कोणाची किती ताकद आहे हे दिसणार. दरम्यान, आता या निवडणुकांचा निकाल अंतिम टप्प्यात आले असून, भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्याच्या १७ ग्रामपंचायती करिता झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, त्यातील ११ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपला झेंडा फडकवला आहे.

    दरम्यान, भोजापुर आणि टेकेपार या दोन ग्रामपंचायतीवर सरपंच आणि संपूर्ण पॅनलचा विजय झाला आहे. विजयी झालेल्या सरपंच उमेदवारांमध्ये पिपरी – देवदास ठवकर, संगम – शारदा मेश्राम, केसलवाडा – आशु वंजारी, खैरी – सलीता जयदेव गंथाडे, टेकेपार – प्रियंका दिनेश कुंभलकर, गोसीखुर्द – आशिष माटे, भोजापुर – सीमा जयेंद्र मेश्राम, राजेदहेगाव – स्वाती रत्नदीप हुमणे, खराडी – आशा संजय हिवसे यांचा विजय झाला आहे. त्यामुळं शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून, राज्यात भाजप व शिंदे गटाची आघाडी आहे.